पुणे येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…
.पुणे.. दि. 26 जानेवारी 2023 रोजी कोथरूड , पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळ , अकलूजच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन एकता व अखंडता यांना प्रणाम करीत प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार श्रीकांत तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड, सौ.तेली मॅडम, संजय सिंह, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. ए. पवार सर ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल. व्ही . जाधव मॅडम व पालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी व चांगला नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडणे ही काळाची गरज असून असेच विद्यार्थी हे देशाची बांधणी चांगल्या पद्धतीने करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न असणे गरजेचे असल्याचे मत प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार श्रीकांत तेली सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी कष्ट , जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काम केल्यास यश हे निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासत चांगला नागरिक होण्यासाठी थोरांचे विचार आत्मसात करून आत्मनिर्भर बनले पाहिजे असे सांगत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कु.एल.व्ही.जाधव यांनीप्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत सर्वांचे स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईड पथ संचलन, कवायती, देशभक्तीपर गीते , देशभक्तीपर भाषणे झाली.यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ,विद्यार्थी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
















