*महर्षि संकुलात विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा* *स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांचे स्मरण करा* डॉ. संभाजी राऊत
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि संकुल येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .प्रमुख अतिथी डॉक्टर संभाजी राऊत हृदयरोग तज्ञ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण घेण्यात आले .संकुलातील आरएसपी, स्काऊट गाईड, गर्ल गाईड व घोषपथकातील विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना देऊन संचलन केले. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक माननीय जयसिंह शंकरराव मोहिते -पाटील तथा बाळदादा यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली तसेच आदरणीय दादासाहेबांच्या शुभहस्ते राज्यस्तरावरील निवड झालेल्या खेळाडूंचा व विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न झाला.संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तालबद्ध सामुदायिक कवायत प्रकार केले . प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी,दांडपट्टा, तलवारबाजी, चौभवरी अशा विविध मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांनी उपस्थित सर्वांच्या मनात जाज्वल्य देशप्रेम निर्माण केले. महाराष्ट्राचा मर्दानी खेळ लेझीम सादर करत बालचमूंनी उपस्थितांची मने जिंकून घेतली .सई जाधवर,श्रावणी बनसोडे, अर्जुन लोखंडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या आठवणींना उजाळा देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रमुख अतिथी यांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासावरती प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशाला समितीचे सभापती ज्येष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे यांनी भूषवले. कार्यक्रमास प्रशाला समितीचे सदस्य कैलास चौधरी ,विनोद जाधव. नितीन इंगवले देशमुख, मुख्याध्यापक संजय गळीतकर ,शिवाजी पारसे व सुनीता वाघ तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला धाईंजे यांनी केले .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या समूहगीताने झाली.








