*एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न*
भारताचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतभर राबविलेल्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व मा. धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनपर एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धा- २०२३ ग्रीनफिंगर्स स्कुल, शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल , शिवरत्न सीबीएसई स्कूल मध्ये दिनांक २५/०१/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे जागतिक पातळीवरील ज्वलंत मुद्दे जी-२०, वसुधैव कुटुंबकम, कोरोना वॉरियर्स, ग्लोबल वार्मिंग, बेटी बचाओ बेटी बचाओ, एक भारत श्रेष्ठ भारत इ. विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.सदर स्पर्धेत एकूण 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण मा.श्री.धैर्यशील मोहिते- पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस सर्व संस्थेचे संचालक, व्यवस्थापन सदस्य,शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.














