*स.मा.वी अकलूज या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…*
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ११ वा राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य. श्री. पाटील सर यांनी मतदार व सर्व विद्यार्थ्यांना मतदान व ननोंदणीसाठी शपथ दिली. तसेच हा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली त्यानिमित्ताने २५ जानेवारी २०११ पासून संपूर्ण देशात हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे. वेळ काढून मतदार यादीत नाव नोंदवा… आपल्या आई, वडील, भाऊ व बहिणीस नाव नोंदणीस सांगा… मतदार नोंदणीसाठी एका वर्षात चार संधी असतात… सदर कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री घंटे सर, उपप्राचार्य श्री. शिंदे सर, कारंडे मॅडम, शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.







