*अनुसूचीत जातींच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्यात लोक चळवळ उभी करु-मा.लालासाहेब अडगळे*
अनुसुचीत जाती मध्ये होणाऱ्या अतिक्रमण बाबत अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. लालासाहेब अडगळे यांनी लेखी तक्रारी महाराष्ट्र राज्य अनुसुचीत जाती जमाती अयोग यांना दिली होती.या अनुसूचीत जाती आयोग कडून सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला लेखी खुलासा मागविण्यात आलेला आहे. या कारवाई मुळे अनुसूचीत जाती व जमाती मधिल घटकांचे हक्क अबाधित राहाणार आहे.खोटे कागदपत्रे गोळा करुन अनुसूचीत जाती मध्ये वेळापूर येथिल जानकर कुंटुब घुसखोरी करण्याच्या तयारीत असतानाच अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. लालासाहेब अडगळे यांनी वेळीच तक्रार करुन या घुसखोर जानकर कुटुंबाला आवर घातला आहे. आता अनुसूचीत जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. सोलापूर येथिल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला देखील या अनुसूचीत जाती जमाती आयोगाच्या पत्रामुळे लालासाहेब अडगळे यांनी धारेवर धरलेले आहे. लालासाहेब अडगळे यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यालयात या प्रकरणा बाबत लेखी तक्रारी केलेल्या होत्या. त्या वेगवेगळ्या कार्यालयातून सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समीतीला जाब विचारले जात आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जाती मधिल लोकांच्या हक्काच्या आरक्षणावर आशा लोकां कडून सतत वेगवेगळ्या पध्दतीने अन्याय अत्याचार होत आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. लालासाहेब अडगळे यांनी आशा लोकांना ठेचुन काढण्यासाठी पाऊल उचलले आहेत. आता येणाऱ्या काळातील निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उत्तम जानकर व जानकर कुटुंब यांनी जो आटहास रचलेला होता. हिंदु-खाटीक प्रमाणपत्र मिळविण्याचा त्यात विर्झन टाकून देण्याचे काम केले आहे. येणार काळ हा अनुसुचीत जातींन साठी महत्त्वाचा ठरणार आहे. अनुसूचीत जाती मधिल प्रत्येक घटकांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे असे मत लालासाहेब अडगळे यांनी व्यक्त केले .माळशिरस तालुका सन २००९ साली अनुसूचीत जातींसाठी राखीव विधान सभा मतदारसंघ झाला आहे. तेव्हा पासून वेळापूर येथिल धनगर समाजाचे नेते श्री. उत्तमराव जानकर यांनी अनुसूचीत जाती मध्ये असणाऱ्या ५९ जाती पैकी एक जात हिंदु- खाटीक चोरली होती. तेव्हा तकालीन स्व.आमदार हंनमत डोळस यांनी या जात चोराला आवळण्याचे काम केले होते. परंतु दुर्दैवाने डोळस साहेबांचे निधन झाले. त्याच्या या अचानक जाण्याने या प्रकरणात जात चोराने पुन्हा डाव साधण्यासाठी आनुसूचीत जातींच्या हक्काच्या आरक्षण वर डोळा ठेऊन स्वतःचा मुलगा जिवन जानकर व मुलगी ज्योती जानकर या दोघांना आगामी जिल्हापरिषेद व पंचायत समीती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनुसूचीत जातींच्या राजकीय आरक्षित राखीव जागावर निवडणुका लढविण्यासाठी तयारी केलेली होती.या दोघा बहिण भावाला उत्तम जानकर यांनी जात चोरी धडे शिकवून त्यांना पण हिंदु- खाटीक दाखला मिळण्यासाठी उत्तम जानकर यांनी हिंदु-खाटीक बनविण्यासाठी त्यांच्या शिक्षणाचे कारण पुढे करुन हिंदु-धनगर जात कागदोपत्री नोंद आसताना हिंदु- खाटीक जात चोरून त्यांचे खोटी जातप्रमाण पडताळणी करुन घेऊन अनुसूचीत जातींच्या राजकीय राखीव जागा हडपण्यासाठी केलेला प्रयत्न हानुन पाडला आहे. लालासाहेब अडगळे यांनी हस्तक्षेप घेतला आणि यांचा जात चोरीचा डाव फसला उत्तम जानकर हे हिंदु-धनगर, त्यांची पत्नी हिंदु-धनगर, त्यांची मुलं हिंदु-धनगर, सुन हिंदु-धनगर, जावई हिंदु-धनगर, सासरवाडी हिंदु-धनगर चुलते हिंदु-धनगर, भावकी सर्व हिंदु-धनगर पाहुणे हिंदु-धनगर, येवढे सगळे हिंदु-धनगर आहेत. शिवाय जानकर यांना धनगर समाजाचे नेते म्हणतात धनगर समाजाच्या हक्कासाठी त्यांनी अंदोलने,उपोषणे केलेली आहेत. हे सर्व महाराष्ट्रतील जनतेला ज्ञात असताना या जानकर कुटुंबातील व्यक्ती आनुसूचीत जातींच्या हक्कावर जाणीवपूर्वक डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. येणारा काळ या जानकर कुंटुबाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही गरज पडाल्यास अनुसूचीत जातींच्या हक्कासाठी महाराष्ट्रात लोक चळवळ उभी करु.असे लालासाहेब अडगळे यांनी मत व्यक्त केलेले आहे. आता माळशिरस तालुका अडगळे यांच्या भुमीके कडे लक्ष देऊन आहेच,







