दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला अखेर गटारी मंजूर करून आणून दाखवली – महेश शिंदे
अकलूज नगर परिषदेचे मनापासून आभार
नवीन बाजार तळावरील एक नंबर लाईन व दोन नंबर लाईनच्या गटारीचे काम अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर चालू झाले. या गटारीसाठी अनेक लक्षवेधी आंदोलने करण्यात आली त्यामध्ये विशेषता गटविकास अधिकारी गैरावा आंदोलन बोंबाबोब आंदोलन महाआरती आंदोलन तसेच धरणे आंदोलन अशा आंदोलनाचा समावेश होता महेश शिंदे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत या गोष्टीचा पाठपुरावा करून अखेर गटारीचे काम चालू केले.या गटारीसाठी अनेक संघर्ष झाला आणि त्या संघर्षाला यश मिळाले त्याबद्दल अकलूज नगर परिषदेचे महेश शिंदे यांनी मनापासून आभार मानले. तसेच नवीन बाजार तळ येथील नागरिकांकडून महेश शिंदे यांचे कौतुक होत आहे.






