महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराचे मोठ्या दिमाखात वितरण..
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी आणि गुरुसेवा शिक्षक परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मोहिते-पाटील बोलत होते.माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय मानाचा समजला जाणारा *”स.म. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार-३१”* माळशिरस तालुक्यातील सन २०२२ साली घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना *”उगवता तारा पुरस्कार ३९”* मार्गदर्शक शिक्षकांना *”राष्ट्र शिल्पकार पुरस्कार -१६”* व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना व शाळांना *”उगवता तारा पुरस्कार”-२४,* तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरील प्रथम आणि द्वितीय क्रमांक विजेता स्पर्धकांना व शाळांना *”उगवता तारा पुरस्कार-४८* पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून जवळपास १००० च्या आसपास शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थिती दाखवली.तसेच महिला आघाडीने आयोजित केलेला हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांनी प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष शिवानंद भरले, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जेष्ठ नेते उत्तमराव जमदाडे, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब धोत्रे, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे सर्व केंद्रप्रमुख,अशोकनाना मगर.ज्येष्ठ नेते विठ्ठलराव काळे,संभाजीराव फुले, जिल्हा अध्यक्ष वीरभद्र यादवाड, सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे (डोगे), जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माजी संस्थापक अध्यक्ष नवनाथ धांडोरे, माजी तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव,आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव भोसले, एकल शिक्षक सेवा मंचचे जिल्हाध्यक्ष इक्बाल नदाफ, राज्य उपाध्यक्ष हुसेन बारस्कर. तालुका सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलराव नष्टे.,मधूकर वनसाळे, महादेव सरवदे,विजय धायगुडे,अनिल बोडरे,महिला आघाडीच्या सरचिटणीस अंबुताई इतापे, कार्याध्यक्ष उमा जाधव त्याचबरोबर तालुका अध्यक्ष हरिभाऊ खरात, सरचिटणीस प्रदीप अवताडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गिरीजा नाईकनवरे, सरचिटणीस मनिषा बळे, कार्याध्यक्षा शहजादी काझी, तालुक्यातील सर्व बीटच्या उपाध्यक्षा आणि गुरुसेवा परिवारावर प्रेम करणारे शेकडो मावळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ गुजर यांनी केले तर आभार नितीन बनकर यांनी मानले.







