निरोगी लांब आणि घनदाट केसांसाठी होमिओपॅथी….. डॉ. कीर्ती गोळवलकर
तुम्ही-आम्ही दूरदर्शनवर जाहिरातीत नित्य, आपल्या लांबसडक केसांचे रहस्य; लाडिकपणे सांगणारी सौंदर्यवती महिला पाहात आहोत, घनदाट केसांची स्टाइल दाखवणारे पुरुष पाहत आहोत; पण हे भाग्य सगळ्याच महिलांना अथवा पुरूषांना मिळतेच असे नाही. असे लांबसडक, घनदाट, सुंदर केस असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. केस हा मानवी सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्यांच्या केसांशी कोणत्याही किंमतीत तडजोड करू इच्छित नसते . पण आज काल केसांविषयी कोणतीही समस्या नसलेला पुरुष किंवा स्त्री पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. केसात कोंडा होणे, केस अकाली पिकू लागणे, ते गळणे किंवा टक्कल पडणे आदी समस्या सध्या सर्रास आढळतात. या समस्या शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे उद्भवतात असे समजून त्यावर उपचार केले जातात. हे उपचार बहुतांश विषमचिकित्साच्या / आधुनीक औषधोपचारांच्या आधारे केले जातात. केस धुण्यासाठी आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेला एक पर्याय म्हणजे रासायनिक घटक असलेले द्रभरूप साबण (शाम्पू). शाम्पूचा आकर्षक सुगंध, जाहिराती, इत्यादींना भूलल्यामुळे अनेकांचा कल शाम्पूचा वापर करण्याकडे असतो. शाम्पू मधील रासायनिक घटकांमुळे त्यांचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेतले जात नाहीत त्यामुळे देखील केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वय झाल्यावर केस पांढरे होणे ठिक आहे. पण हल्ली कमी वयातच केस पांढरे व्हायला लागतात. एकदा केस पांढरे झाले की कमी वयातच आपण वयस्कर झालो याचं आपल्याला टेन्शन यायला लागतं. मग कधी मेहेंदी लावून हे पांढरे केस लपवावे लागतात तर कधी कलर करुन. केस काळे करण्यासाठी च्या हेअर कलर च्या देखील असंख्य जाहिराथी बघून ते वापरले जातात आणि केसांच्या समास्या अधिकच वाढतात.केसांच्या या समस्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतात आणि बाजारातील या पर्यांयामुळे अनेकदा रिअॅक्शन होण्याचा धोका असतो. कधी कधी हे पर्याय परवडणारेही नसतात. मग अश्या वेळी काय केले पाहिजे जेणे करून समस्या मूळापासून दूर होईल, याचा आपण आज ऊहापोह करूया. एखाद्या व्यक्तीचे दररोज 50 ते 70 केस गळत असल्यास घाबरण्याचे कारण नाही कारण केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेव्हा अति प्रमाणात केस गळती होते तेव्हा या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला तसेच पुरुष वर्ग या दोघांसाठी वेगळे – वेगळे उपाय आवश्यक असतात त्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांचे आणि पुरुष वर्गाची शरीरयष्टी तसेच शरीरा मधील हार्मोन्सचे प्रमाण आणि प्रकार पूर्णतः वेगळे असतात. त्यामुळे दोघांना एकाच प्रकारचे औषध उपचार, अथवा तेल, साबण, शाम्पू वापरणे हे अतिशय चुकीचे आहे. सध्याच्या काळात केस गळण्याची समस्या गंभीर स्वरम धारण करत असून त्यावर ती उपाय योग्य त्या मार्गदर्शनाखाली करणे अतिशय गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.केसांची वाढ व्यवस्थित पद्धतीने होत असल्यास, दिवसभरात थोडेफार केस गळणे याने फारसा फरक पडत नाही; कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु केसांची वाढ देखील थांबली आहे आणि गळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे ही एक गंभीर समस्या असू शकते.केस गळती साठी वेगळी वेगळी कारणे असू शकतात; उदाहरणार्थ वैद्यकीय परिस्थिती अथवा आजार, शरीरामधील हार्मोन्स मधील झालेले बदल, अनुवंशिकता आणि केसांना वापरले जाणारे तेल अथवा इतर केमिकल युक्त पदार्थ; या सर्वांचा केसांच्या आरोग्यावर आणि केसांच्या मुळांवर दुष्परिणाम होतो .योग्य असा पौष्टिक – सकस आहार, फळे इत्यादींचे प्रमाण व्यवस्थित ठेवल्यास आणि सोबत होमिओपॅथिक औषधोपचार केल्यास केसांच्या सर्व समस्यांपासून अगदी सहजपणे मुक्त होता येते.केसांच्या समस्येसाठी होमिओपॅथिक औषध उपचार हे सर्वतोपरी परिपूर्ण असतात. मुख्य म्हणजे यामध्ये वापरल्या जाणारी औषधे आणि केसांना लावण्यासाठी दिली जाणारी औषधे ही पूर्णपणे नैसर्गिकरीत्या तयार केलेली असल्यामुळे यामध्ये कोणताही प्रकारच्या केमिकलचा समावेश नसतो; त्यामुळे होमिओपॅथिक औषधे वापरण्यास अत्यंत सोपी आणि कोणताही दुष्परिणाम न करणारी असतात. परंतु त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन आणि आपल्या समस्यांसाठी योग्य तो औषधोपचार करणे गरजेचे असते; स्वतः वाचून व्हाट्सअप, फेसबुक वर बघून किंवा इतर कोणाचे तरी ऐकून मेडिकल मधून औषधे घेऊन वापरल्यास त्याचे दुष्परिणाम नक्कीच होऊ शकतात.होमिओपॅथिक औषध उपचारांसाठी प्रथमतः पेशंटची इत्यंभूत माहिती घेतली जाते आणि त्याच्या समस्येची पूर्ण पणे उकल केली जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती या व्याख्येप्रमाणेच प्रत्येक रुग्णांसाठी त्याला गरजेचे असे वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळे औषध वापरले जाते.वेगळ्यावेगळ्या वनस्पतींमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण असतात काही विशिष्ट दिवसात अथवा ऋतूंमध्ये जर या वनस्पतींची पाने, फुले, मोहोर, फळे, खुडली आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून; त्यांची रोग निवारण शक्ती वाढवून त्याचे औषधात रूपांतर केल्या असता; हे औषधे अत्यंत उपयुक्त ठरतात. अशाच प्रकारची औषधे होमिओपॅथी मध्ये केसांच्या समस्या साठी वापरली जातात आणि अशा प्रकारची औषधे आता अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करून बाहेरच्या देशातून सुद्धा मागवता येऊ शकतात हा जणू परमेश्वरी कृपाप्रसादच म्हणायला पाहिजे. काही होमिओपॅथिक औषधे पोटात घेतली जातात तर काही केसांना आणि केसांच्या मुळापाशी त्वचेला लावली जातात, इतकेच नाही तर ही औषधे पाण्यामध्ये योग्य प्रमाणात मिसळून, प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि मशीनच्या सहाय्याने त्यांची वाफ केसांना दिली असता ही औषधे केसांच्या मुळाशी चांगल्या पद्धतीने मुरूम त्यांना चांगली बळकटी देतात.काही औषधे नमूद करत आहे परंतु यांचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. केस दाट होण्यासाठी, मूळ गळण्याचे कारण काय आहे हे पाहिले जाते आणि त्यानुसार औषधे सुरु केली जातात. आर्स-अल्बम, थुजा, सेपिया, काली-मुर, ग्राफाइटिस, ऍसिड फॉस, थायरॉइडिनम औषध, मेझेरियम औषध, काली कार्ब , नायट्रिक ऍसिड, यूस्टिलेगो, लाइकोपोडियम, फॉस्फरस आणि कॅल्केरिया फॉस; ही औषधे योग्य त्या मात्रे मध्ये आणि योग्य त्या प्रमाणामद्धे वापरता येतात.एगनेशिया – फार दिवसाचे दुखा:यचे कारण असल्यास लायकोपोडियाम – बाळंतपणानंतर किंवा एखाद्या दीर्घ आजारानंतर केस केल्यास मर्क सोल – डोक्यामध्ये आणि शरीरावर अति जास्त घाम येत असल्यास बायोकेमिक – सिलिशिया, नॉट्रॅम मुर अशी अनेक प्रकारची औषधे ही केसांच्या गळण्याच्या समस्येवर दिली जातात.केस गळतीची अनेक कारणेहार्मोनल असंतुलनपाणीदीर्घ आजारप्रदूषणशाम्पूचा / इतर प्रसंधानांचा अतिवापरअति तणाव किंवा चिंताडोक्यात कोरडेपणाकोंडा,केसांची मुळे कमकुवत होणे काय करावेसंतुलित आहार आहारामध्ये फळांचे प्रमाण हिरव्या पालेभाज्या तणाव मुक्त जीवन आनंदी राहा रोज हलकाफुलका व्यायामहोमिओपॅथिक उपचारडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधेपोटात घेण्याची औषधे केसांना आणि स्काल्पला लावण्याची औषधे होमिओपॅथिक तेल आणि शाम्पू होमिओपॅथिक औषधांची वाफ
डॉ . कीर्ती समीर गोळवलकर (एम. डी. होमिओपॅथी) होमिओपॅथि तज्ञ(असि.
प्रो. महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, सोलापूर)Dr. Golwalkar’s || दीर्घायु ||होमिओ केअर सेंटर, पहिलं मजला, रोहन कमर्शियल सेंटर,जूने राघोजि किडनी हॉस्पिटल शेजारी,विजय क्लिनिक समोर,सोलापूर . 7769097309…







