प्रा. तात्यासाहेब काटकर यांना पत्रलेखक संघ इचलकरंजी यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज (आनंदनगर )येथील स. मा. वी. चे शिक्षक प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर यांना वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांच्या वतीने दैनिक जनमत मध्ये प्रकाशित झालेल्या अपेक्षांचे ओझे ठेवुच नका या लेखाची निवड करण्यात आली आहे.सदर पुरस्कार 22जानेवारी रोजी समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी येथे सन्मान पूर्वक देण्यात येणार असल्याची माहिती वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी दिली.प्रा. तात्यासाहेब काटकर हे गेल्या अनेक वर्षापासून विविध वृत्त पत्रातून वेगवेगळ्या विषयावर प्रासंगिक लेखन करीत आहेत. त्यांचे आजपर्यंत दैनिक जनमत, सुराज्य, सकाळ, लोकमत, तरूण भारत, जनसत्य अशा वेगवेगळ्या दैनिकात सुमारे ४०० पेक्षाही अधीक लेख प्रसिद्ध झाले आहेत.तसेच वेगवेगळ्या मासिकात ४० लेख,5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांना आत्तापर्यंत २५ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाले आहेत.वेगवेगळ्या शासकीय कमिटी मध्ये सुद्धा ते सहभागी आहेत.याशिवाय राष्ट्रीय, राज्यस्तरीय ३२ रिसर्च पेपर तयार केले आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.







