*जि. प. आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे हुतात्मा दिन,राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
संग्रामनगर दि.१२ (केदार लोहकरे यांजकडून) माळेवाडी अकलूज जिल्हा परिषद शाळेमध्ये हुतात्मा दिन,राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग नकाते होते. कार्यक्रमाची सुरुवात ललितागौरी राणे यांच्या आवाजात ‘जिजाऊ वंदना’ घेऊन झाली व शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका विद्या नवले यांच्या हस्ते चार हुतात्मा,जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी जिजाबाई, स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचे विचार आपल्या भाषणातून मांडले. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या वेशात भाषण केले.शिक्षकांमधून स्मिता कापसे, प्रतिभा गोडसे व मनिषा पांढरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलची माहिती सांगितली तर सुषमा राऊत यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी केले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललितागौरी राणे यांनी केले तर सूत्रसंचालन ललितागौरी राणे यांनी तर आभार प्रदर्शन विद्या नवले यांनी केले.हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी योगदान दिले.







