माळशिरस तालुका भाजपा च्या वतीने माळशिरस येथे अजित पवार यांच्या वक्तव्या बाबत निदर्शने
अकलूज (प्रतिनिधी )अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच समस्त महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे, आपले हे वक्तव्य मागे घेत अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा व जाहीर माफी मागावी, यासाठी तहसीलदार कार्यालय, माळशिरस येथे भारतीय जनता पार्टी, माळशिरस तालुक्याच्या वतीने निदर्शन करण्यात आले.. ४० दिवस मरण यातना सहन केल्या माझ्या राजानं, पण हिंदू धर्म बदलला नाही ! होय, “धर्मवीर”च होते माझे “छत्रपती संभाजी महाराज”. धर्माबाबत अशी उच्च धारणा असलेल्या आणि तसेच जीवन जगत सुमारे ४० दिवस यातना भोगून, बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत असं बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांप्रती निषेध व्यक्त करत तीव्र घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी आ.राम सातपुते, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब सरगर, हनुमंतराव सुळ, सोपान काका नारनवर, बाळासाहेब पराडे पाटील, बाळासाहेब वावरे, संजय मोटे, संदीप घाडगे, सुरज मस्के, सौ. कल्पना कुलकर्णी, दादा खरात, हनुमंत सरगर, महादेव कावळे, तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते.














