*महर्षी प्रशालेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील तथा अण्णासाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणी शिबिरामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी मधील 385 मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली मुलींना चक्कर येणे अशक्तपणा तसेच वारंवार आजारी पडणे यासारख्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला एनीमिया चे प्रमाण झपाट्याने कमी होते म्हणून चक्कर येणे त्वचा पिवळी पडणे ,डोकेदुखी, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात सदर शिबिरासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर ,पोपटराव देठे,शिवाजी पारसे ,प्रशाला समितीचे सदस्य अनिल जाधव विभाग प्रमुख नकुसा वाघमोडे किरण सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले शिबिरासाठी यशवंतनगर आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल आव्हाड ,कर्मचारी डॉक्टर झुरळे ,मकानदार, सविता कारंजे, उदय सणस ,महादेव दडस, संभाजी गंगाधरे ,मोरे सिस्टर बनसोडे सिस्टर यांचे सहकार्य लाभले वैद्यकीय अधिकारी अमोल आव्हाड यांनी मुलींना डिंक लाडू ,शेंगा लाडू ,गुळ शेंगदाणे, राजगिरा लाडू व हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला शेवटी बापू बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली







