नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारू नकाे दूध प्या अकलूज पाेलीस आणि पाेलीस मित्र परीवाराचा अभिनव उपक्रम अकलूज (प्रतिनिधी )नवीन वर्षाच्या निमित्ताने तरूणाई वाजवीपेक्षा जास्त उत्साही असते.त्यात नवीन वर्षाचे स्वागत करताना तर …दारू पिवून वेडीवाकडी गाडी चालवून मोठ्याने अेारडून करायचं असं ठरलेलं असतं ..मग धडकाधडकी ..पडापडी हाेवून पून्हा रडत पडत दवाखान्यात पडून स्वागत करायचं …हे नेहमीचं चित्र ….परंतू यावर्षी २०२३ सालाचं स्वागतं मात्र अकलूज पाेलीस आणि पाेलीस परीवार वेगळया पध्दतीने करून नवीन अभिनय उपक्रम करणार आहेत … यावेळी बाेलताना पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर म्हणाले की ,तरूणाईने संयम बाळगून साैजन्याने व आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करावे. दारू पिवून स्वागत करण्यापेक्षा दूध पिवून आनंदाने स्वागत करावे.असे आवाहन केले आहे .अकलूज पाेलीसांच्या साेबतीला खंबीर साथ म्हणून पाेलीस मित्र परीवाराची टीमही साेबत राहणार असून,समन्वयक म्हणून रमेश सूरवसे पाटील यात सहभागी हाेवून अनेक सामाजीक कार्यकर्ते व मान्यवर आणि पालक महीला मंडळ यात सहभागी हाेत आहेत व स्वागत करीत आहेत आणि काैतूक करीत आहेत.






