राजकारणापलीकडील माणूस – जयसिंह(बाळदादा )मोहिते पाटील-प्रा. काटकर तात्यासाहेब शिवाजी 9226144836
प्रत्येकाच्या आयुष्यात एक बाप माणूस असतो, त्यांच्यामुळे आपण आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यात एवढे महत्त्वाचे स्थान असते त्या माणसाचा उल्लेख आपण नेहमी अभिमानानेच करतो. वादळ वाऱ्याची पर्वा न करता प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा असणारा, आपल्या कुटुंबाचा रक्षण करता, चंदनासारखे झिजून आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरणारा, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना प्रसंगी ओठी कठोर पण पोटी अमाप माया असणारा असा बापमाणूस म्हणजे जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील. एक व्यक्ति स्वतःच्या करिश्म्यावर राजकरणातून समाजपरिवर्तनाचे एवढे प्रचंड काम करू शकतो हे ज्यांनी आख्या महाराष्टा ला दाखवून दिले ते म्हणजे जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील. शिवरायांचा कर्मयोगी आणि महर्षि विश्व्मित्राचा अथक मेहनतीपणा या गुणांचा संगम दादासाहेबांच्यात पहायला मिळतो. गर्विष्ठ देवदेवतांना आव्हान देऊन विश्वमित्रानी प्रतिसृष्टिनिर्माण केली त्याच धर्तीवर कुटुंबाच्या माध्यमातून राजकीय प्रतिसृष्टि निर्माण करून शिवरायांचा लढाऊ बाणावापरून राजकरणातून समाज परिवर्तनाचे व समाजसुधाराचे महान कार्य केले आहे. विश्वमित्राने नारळ निर्माण केला असे मानले जाते. नारळाला वरुन कठीण कवच आणि आतून गोड़ खोबरे व त्यानंतर अमृतासारखे गोड़ पाणी असते. दादांचेही तसेच आहे. वरुण कठोर पण आत हळवेपणा, भावनाप्रधान आणि कठोरता यांचा संगमच दिसतो. बाळदादा म्हणजे सोलापुर जिल्ह्याचा अक्षांश रेखांश माहित असणारं चालत बोलत गुगलच. अफाट वाचन, स्मरणशक्ती, जनसंपर्क, प्रबळ इच्छा शक्ती, संयम असलेलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व. कामातले सातत्य, ऊर्जा आणि नाविण्य अनुकरणीय आहे. ही व्यक्ती शब्दांच्या पलीकडची आहे, कल्पनेच्या कक्षेत बसु शकत नाहीत. कामातील बदल हाच खरा आराम” या तत्वानुसार बाळदादा नेहमी नवनवीन ठिकाणी जावुन निरनिराळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. जे आपल्याकडे करणे शक्य आहे असे तंत्रज्ञान त्यांच्या नजरेतुन सुटत नाही मग ते शैक्षणिक, शेती, क्रीडा व सहकाराच्या असो किंवा पर्यटन क्षेत्राच्या बाबती असो सतत काहीतरी नवीन करण्याचा संकल्प दादांचा असतो. बाळदादा एकमेव राजकारणी असतील की कोणतेही पद असो नसो सत्ता असो नसो पण कायम जनतेचे प्रश्न सोडिवण्यासाठी प्रयत्नशील. राजकारणाच्या पसारयात हाच एक असा नेता आहे ज्याने कधीही आपल्या माणसांना दगा दिला नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला. म्हणुनच मध्यम व गरीब वर्गाला दादांविषयी विशेष प्रेम आजपर्यंत तर आहेच व उद्याही राहनार आहे. ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील असा एकमेव नेता सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तो म्हणजे फक्त जयसिंह मोहिते पाटील. दादांनी अनेक गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. आजही तरूणांना लाजवेल असे काम करताना आपण पाहतो. सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा तर तो फक्त दादानीच. आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी अनेक कार्यक्रम केले यामध्ये गौरव मराठी मातीचा व गौरव भारतीय लोककलेचा दोन वेळा सादर केला. ग्रामीण भागातील लोकांना दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तो पाहता येत नाही म्हणून त्याच धर्तीवर अकलूज मध्ये मोठ्या उत्साहात संचालन व अनेक चित्ररथाच्या माध्यमातून साजरा केला तसेच गड किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी अकलूज मधील किल्ला पाहण्यासारखा करण्यात आला. आजच्या पिढीला शंभर वर्षांपूर्वीचे खेडेगाव कसे होते, जुन्या लोकांचे विचार व प्रेरणा मिळण्यासाठी पुणे येथे शंभर वर्षापूर्वी चे खेडेगाव तयार केले यामध्ये ग्रामीण लोकांची परस्थिती, राहणीमान व संस्कृती जतन कशी केली हे दाखवले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी विज्ञान यात्रा तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी आनंदयात्रा घेतली. कला, क्रीडा, राजकीय सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा ऊमटवला आहे. दादांबरोबर अगदी कोणीही बोलु शकतो व कोणीही आपली अडचण सांगु शकतो. आपल्या वडीलांच्या नजरेत आसतो. तसेच दादांच्या नजरेत कोणी छोटा नाही किंवा कोणी मोठा नाही, सर्वांना समान वागणूक. एक सामान्य नागरिक ते वेगवेगळे अध्यक्ष पदे अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतःतील बापमाणुस कटाक्षाने जपला आहे. अशा या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
..प्रा. काटकर तात्यासाहेब शिवाजी 9226144836



























