श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन साजरा.
अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च टेंभुर्णी या महाविद्यालयात संविधान दिन एमक्यूर फार्मा इंडस्ट्री मधील सीनियर सायंटिस्ट श्री . मंगेश जगदाळे यांच्या हस्ते साजरा केल्याची माहिती प्राचार्य डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली. 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासात अतिशय खास मानला जातो. या दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया रचला गेला. भारतात दरवर्षी आजचा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान होते. म्हणून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. यामध्ये श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे ,संस्थेचे अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे ,उपाध्यक्ष बाबा येडगे , प्रा. अक्षय भेंकी, प्रा. महादेवी भोसले , उपस्थित होते . कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.दिव्या ओस्तवाल व प्रा. प्राची पुराणिक यांनी कार्य केले.







