अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मधील विद्यार्थ्यांनी भर रस्त्यावर प्रसूती होत असलेल्या महिलेची प्रसूती करून दाखविले माणुसकीचे दर्शन.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मधील चतुर्थ वर्षांत शिकत असलेले विदयार्थी दत्तात्रय किसवे व शिवाजी तरंगे हे काही कामानिमित्त 26नोव्हेंबर रोजी रात्री देवडिकर हॉस्पिटल जवळ च्या रस्त्यावरून जात असताना त्यांना अचानक एक ऊसतोड मजूर महिला अचानक ऐन भर रस्त्या मध्ये प्रसूती होताना आढळली. एवढेच नव्हे तर त्यावेळी रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या कोणीही मदत केली नाही.नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.त्यावेळी या दोन विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवून आपण शिकत असलेल्या नर्सिंग कॉलेज मध्ये घेतलेल्या शिक्षणाच्या आधारे बाळाला बाहेर काढून व त्याची नाळ कापून त्याचा जीव वाचविला.त्याचबरोबर त्या महिलेला व्यवस्थीत उपजिल्हा रुग्णालय अकलूज याठिकाणी ऍडमिट केले.
चौकट :-
शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांना सदरची माहिती समजल्यानंतर त्यांनी या दोन विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान चे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची पाठ थोपटली.
चौकट :-
अकलुज येथील देवडीकर दवाखान्यासमोर परराज्यातली महिला रोडवरती डिलिव्हरी झाले असल्याचा फोन आला व तिच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते.कोणीतरी एक ताई व दोन मुले होती. त्या ताईंनी बाळाला घेऊन स्वच्छ करून तिच्याजवळ ठेवले होते. घरून निघतानाच 108 नंबर वर फोन लावून अम्बुलन्सला आधीच कल्पना दिली कि दवाखान्यासमोर या पेशंट तिथे आहे लगेच अम्बुलन्स आल्या नंतर डॉ. संतोष खडतरे डॉक्टरांना फोन केला. पेशंट घेऊन येत आहे सरकारी दवाखान्यात त्यांनी त्यांची तिथे टीम उपस्थित करून बाळाला व बाळाच्या आईला ऍडमिट करून घेतले ते आई व बाळ सुखरूप आहेत.मानव सेवा हीच ईश्वर सेवा. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ. माझ्या हातून खूप मोठं काम झाले जिथे गरज होती तिथे मला ईश्वराने त्या ठिकाणी पाठवले मी स्वतःला मोठा भाग्यवान समजतो व जी माझी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेने माझी पश्चिम भारत अध्यक्षपदावर जी निवड केली त्या पदाशी व कर्तव्यशी मी एकनिष्ठ राहून माझे कार्य मी केले ती माई माऊली आणि बाळ सुखरूप आहेत.अमोल बाळासाहेब माने.पश्चिम भारत अध्यक्ष. अकलूज.










