अकलूज येथील सौदागर दिगंबर घोडके यांना भारतीय सैन्य दलात बढती
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील मूळचे रहिवाशी असलेले सौदागर दिगंबर घोडके हे भारतीय सैन्य दलात हैदराबाद येथे हवालदार या पदावर कार्यरत होते.त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरी ची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांना या पदावरून नायब सुभेदार पदी बढती दिली आहे.त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ते सैन्य दलात १५ जानेवारी २००१ पासून देशसेवा करत आहेत.त्यांनीबिहार, फिरोज पुर, राष्ट्रीय रायफल, हलद्वणी, पठाणकोट,इंनजिबी, नुजियल,बायगुडी,लेह, कोटा,जम्मू रुजोरी या ठिकाणी देश सेवा बजावली आहे.दरम्यान अकलूज येथील त्यांच्या मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








