संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल फरकांडे आणि गणेश सूर्यवंशी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.त्या शेतकरी कुटूंबाला केली मदत.
संभाजीनगर (प्रतिनिधी )मराठवाडा विभाग हा नेहमीच दुर्लक्षित म्हणून ओळखला जातो. सध्या ओल्या दुष्काळाच्या झळा भोगत आहे.सरकार याबाबतीत अजिबात लक्ष देत नाही. लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण म्हणजे दीपावली. परंतु हा सण साजरा करण्यासाठी जगाचा पोसिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत.लोकप्रतिनिधी देखील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी उदासीन आहेत.20ऑक्टोबर रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव या एका खेडेगावातील ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण यांचा ABP माझा वर व्हिडीओ प्रकाशित झाला तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात सोशिअल मीडिया वर प्रचंड व्हायरल व्हायरल झाला होता तो प्रत्येकाच्या काळजात घाव घालणारा होता. हे बघून सामाजिक कार्यकर्ते अनिल फरकांडे यांनी रामजी यांना फोन करून काही करा या मुलाची माहिती काढा याची व याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आपल्या कडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण यांची दिवाळी गोड करूयात. असे सांगितले.त्यानंतर रामजी यांनी Abp माझा चे नवनाथ बन यांना फोन केला या मुलाचा पत्ता मला हवाय असे सांगितल्यावर त्यांनी ज्या रिपोर्टर ने या मुलाची बाईट घेतली त्या कृष्णा खेंडे त्यांचा नंबर पाठवला त्यांना कॉल करून त्या मुलाच्या सगळ्या डिटेल्स घेतल्या. त्यानंतर संभाजी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर शिवसैनिक गणेश सूर्यवंशी यांनी सामाजिक भान आणि उत्तरदायित्व जपत वेळात वेळ काढून आपली सर्व कामे बाजूला ठेऊन लगेच त्या मुलाच्या घरी जाऊन या कुटुंबाची दिवाळी काही अंशी का होईना गोड केली. गणेश सूर्यवंशी हे सामाजिक कार्यकर्ते असून ते नेहमीच परिसरातील गरजू कुटूंबाना मदत करीत असतात.त्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ताबडतोब या कुटूंबातील सर्व व्यक्तींना कपडे, मिठाई, जीवनावश्यक वस्तू देऊन गरीब शेतकरी कुटूंबाची दिवाळी साजरी केली.अनिल फरकांडे आणि गणेश सूर्यवंशी यांच्या या स्तुत्य कार्याला सलाम.सामाजिक संवेदना जागृत असल्या की त्याला सामाजिक आधार द्यायला समाजभान देखील असावे लागते.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.अनिल फरकांडे आणि गणेश सूर्यवंशी यांनी मात्र सामाजिक बांधिलकी जोपासात या कुटूंबाला मदत केली. आणि माणुसकी जिवंत ठेवली.








