*गणपती बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या परिक्षेत घवघवीत यश*
अकोले (खुर्द), ता. माढा येथील गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या बी फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे, रायगड तर्फे घेण्यात आलेल्या बी. फार्मसी परीक्षेत प्रथम वर्षामध्ये स्नेहल सुधीर मोरे आणि दीप्ती संजय गाडे यांनी प्रथम(९.४८ %) , शितल तानाजी सोलंकर यांनी व्दितीय (९.४१ %) तर ऐश्वर्या कृष्णा देशमुख यांनी तृतीय क्रमांक(९.३७ %) मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. आर. डी.बेंदगुडे, अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. रुपाली बेंदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. सुकुमार लांडे प्रा. शिवराज ढगे, प्रा. महादेवी भोसले, प्रा. गंगा गोरे यांनी परिश्रम घेतले.











