*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन विविध उपक्रमाने साजरा.*
संग्रामनगर दि.१६ (केदार लोहकरे यांजकडून)विद्यार्थ्यांनी डॉ.ए..पी..जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचाराचे आकलन आत्मसात करून आपला आत्मविश्वास जागृत केला पाहिजे असे मत शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.बागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ते आणखी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देशातील विविध तज्ञांची, मान्यवरांची व विद्वानांची नीतिमूल्य जपली पाहिजे आणि हेच खरे राष्ट्र निर्मितीमध्ये आपले योगदान आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त शंकरराव मोहिते महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन विविध क्रमाने साजरा करण्यात आला.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.डी.एस.बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक आर.के.इंगोले,सौ.मिले मॅडम,सौ.देशमुख मॅडम,डॉ.नलवडे,प्रा.एन.टी.लोखंडे,प्रा.व्ही.बी.सूर्यवंशी,प्रा.सज्जन पवार,प्रा.दादासाहेब कोकाटे,कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे,ग्रंथपाल प्रा.डी.एस.पाटील आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल श्री.डी.एस.पाटील यांनी केले त्यांनी यामध्ये वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पाठवून दिले.यावेळी ग्रंथालयाच्या वतीने मराठी कथा कादंबरी, क्रमिक पुस्तके,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम लिखित पुस्तकांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे भितीपत्रक स्वरूपात प्रदर्शन मानण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. जनार्दन परकाळे यांनी मांडले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








