*जि प प्रा शा रावबहाद्दूर गट (बिजवडी) येथे हात धुवा दिन साजरा*
. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी शाळेत जागतिक हात धुवा दिन व भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शाळेत साजरा झाला. या वेळी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक श्री श्रीकांत राऊत सर यांनी जागतिक हात धुवा दिनाचे महत्व विषद करून हात व्यवस्थित न धुतल्यामुळे होणारे आजार व दुष्परिणाम उपस्थितांच्या मनावर ठसवले. यावेळी प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. सात प्रकारे हात कसा धुवावा याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगण्यात आली.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश क्षीरसागर सर व अंगणवाडी सेविका गिरीजा गेजगे मॅडम व सारिका चव्हाण मॅडम उपस्थित होत्या.







