*धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा!*
मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन केले आहे. ‘तथागतांचा मानव कल्याणाचा विचार आणि पंचशील अनुसरण यामध्ये समाज परिवर्तनाची महान शक्ती असल्याचंही ते म्हणाले आहेत.तथागतांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश घेऊनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधींच्या जीवनात नवी पहाट आणली. हा दिवस आपल्यासाठी सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे. या निमित्ताने भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,’असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.







