शिवरत्न नाॅलेज सिटीला वाखरी येथील विद्यार्थांची अभ्यास भेट
अकलूज: पंढरपूरच्या वाखरी येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला व विज्ञान शाखेकडील दीडशे विद्यार्थी शंकरनगर येथील शिवरत्न नाॅलेज सिटीला भेट दिली. या अभ्यास भेटीत आश्रम शाळेतील प्राचार्य अशोक माळी, डॉ. सुशीला वलेकर, प्रा. भक्ती गायकवाड, प्रा. राहुल शिंदे, प्रा. महादेव तळेकर, प्रा. रवी रणदिवे, प्रा. सचिन चव्हाण यांच्या सह विद्यार्थी -विद्यार्थींनीनी नाॅलेज सिटी संकुलातील विजयसिंह मोहिते पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व ग्रीन फिंगर काॅलेज ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजी या तिन्ही शाखेतील विविध विभागांना भेट दिली. या वेळी प्राचार्य व प्राध्यापकांचे स्वागत शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार व ग्रीन फिंगर काॅलेज ऑफ कंप्युटर टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य डॉ. महेश ढेंबरे यांनी सर्वांचे स्वागत केले. अभ्यास भेटीत उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाची माहिती प्रा.वाशीम सय्यद व कु. अलीशा मोरे यांनी दिली. तसेच ग्रीन फिंगर काॅलेजची माहिती प्रा. धनश्री हातोळकर व नर्सिंग काॅलेजची माहिती प्रा. विराट गोरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अलीशा मोरे यांनी केले व प्रा. अनिल लोंढे यांनी आभार मानले. सदर अभ्यास भेट शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व उपाध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी प्रा. संजय साळुंखे, प्रा. भरत साठे, प्रा. कु. प्राजक्ता शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते.









