*महाविकास आघाडीला धक्का! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली ‘ती’ यादी मागे?*
मुंबई: पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या मुद्दावरुन राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या 12 जणांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवीन बारा जणांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने 12 जणांच्या शिफारशीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. मात्र अखेरपर्यंत राज्यापालांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. यादी मागे घेण्यासाठी शिंदे सरकारने मागील आठवड्यात राज्यापालांना पत्र पाठवले होते. ही यादी मागे घेण्यासाठी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आठ जागा भाजपाला तर शिंदे गटाला चार जागांचा फार्मुला ठरला असल्याचे सांगितले जात आहे. आता नव्या सरकारने यादी सादर केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







