अकलूज परीसरातील गणेश मंडळासाठी विघ्नहर्ता अँवार्ड ची कमिटी जाहीर .शासकीय नियंम व अटी ची पूतर्ता केल्यास विघ्नहर्ता अँवार्ड नक्की गणेश मंडळांचा प्रचंड प्रतिसाद
अकलूज(प्रतिनिधी ) अकलूज पाेलीस आणि पाेलीस मित्र परीवार यांचे सह नगरपरीषद अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने अकलूज नगरीतील गणेश मंडळांसाठी “विघ्नहर्ता अँवार्ड ” देण्याचे गणेशाेत्सव काळाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले हाेते. आणि त्यानुसार काही माैलीक सूचना, सरकारी नियम व अटीच्या आधीन राहून जारी केल्या हाेत्या.त्यानुसार आज दिनांक ३ सप्टेंबर २०२२ राेजी पाेलीस स्टेशन अकलूज येथे पाेलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि नगरपरीषदेचे मुख्याधिकारी दयानंद गाेरे यांचे मार्गदर्शनाखाली विघ्नहर्ता कमिटी ची स्थापना आणि घाेषणा करण्यात आली. सरकारी नियम व अटी सह गणेश मंडळाची माहीती अदयावत भरण्यासाठी व निकष ठरविणेसाठी विहीत नमुना फाँर्म जारी करून ताे आज कमिटीच्या स्वाधीन केला. आणि कसे निकष यावेळी कमिटीत निवड केलेले सदस्य पाेलीस मित्र परीवाराकडून ज्येष्ठ सदस्य आणि राज्य संघटक प्रमुख म्हणून विष्णू आंधळकर,व्रतपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून भाग्यवंत नायकुडे,शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ प्राध्यापक राजशेखर कुंभार,नगरपरीषद अकलूजच्या वतीने युवा प्रतिनिधी म्हणून राेहीत शेटे,आणि पाेलीस स्टेशन अकलूजच्या वतीने व पाेलीस परीवाराचे व ग्रामसूरक्षा दलाचे समन्वयक म्हणून पाेलीस हवालदार रमेश सुरवसे पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.विघ्नहर्ता अँवार्ड साठी ही कमिटी अकलूज शहर व परीसरातील लहान व माेठया मंडळांना भेट देवून तीन अँवार्ड माेठया गणेश मंडळाला (माेठा गट ) व तीन अँवार्ड लहान गणेश मंडळाला (छाेटा गट ) दिला जाईल. या शिवाय सुंदर डेकाेरेशन, आवाजाची तिव्रता व मिरवणूकीत सरकारी नियमाचे पालन करून वेळेच बंधन पाळल्यास उत्तेजनार्थ पारिताेषकही दिले जाईल. अकलूज शहरा व्यतीरिक्त इतर लहान गावासाठीही हाच निकष लावून अँवार्ड दिला जाईल असे कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. ही कमिटी उदयापासून सर्व मंडळांना भेटी देणार असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंडळाला अँवार्ड मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले आहे.






