वाहनांमुळे अनेक फायदे झाले आहेत, परंतु असा एकही दिवस जात नाही की अपघाताविषयी बातमी नाही. खरंतर अपघात क्वचित घडला तर तो अर्थपूर्ण राहतो, नाही तर ती एक सामाजिक उणीव बनते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून बहुतांश अपघात टाळले जाऊ शकतात म्हणूनच अकलूज येथील देशमुख परिवाराने यंदा गौराईंच्या सजावटीतून ‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ हा देखावा साकारला आहे.गौरी-गणपती हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर या माध्यमातून कुटुंबातील सदस्यच नाही तर शेजारी, मित्र परिवारही एकत्र येतो. उत्सव काळात ताणतणाव, हेवेदावे विसरले जातात. त्यामुळे सामाजिक भावना वाढीस लागते. याच उत्सवात साकारलेल्या देखाव्यातून जनजागृतीही केली जाते. यशवंतनगर भागातील देशमुख कुटुंबही दरवर्षी वेगवेगळे देखावे, सजावटी करून महत्त्वाचे विषय समोर आणते. सलग तिसऱ्या वर्षी सामाजिक विषय घेऊन गौरी सजावट केल्याने परिसरात हा देखावा कौतुकाचा विषय ठरला आहे. या सजावटीमध्ये गौराईंसमोर रस्त्यांचे जाळे विणले असून ठिकठिकाणी वाहने वाहतूक नियमांचे पालन करीत आहेत. शाळा व हॉस्पिटल समोर ‘नो हॉर्न’ झोन आहे. पादचारी ‘झेब्रा क्रॉसिंग’ वरून रस्ता पार करताना दिसून येतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी यासाठी रुग्णवाहिकेला इतर वाहनांनी वाट मोकळी करून दिलेली आहे. ट्राफिक सिग्नल्स, वाहतुकीचे चिन्हे, रस्त्यावरील वाहने, संदेश फलक यांचा वापर करून अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने मांडलेला हा देखावा सर्वांना रस्ता सुरक्षेबाबत सजग करतो.
*गौराईंनी लावला आहे ‘सीट बेल्ट’*_माहेरी येणाऱ्या गौराई थाटामध्ये मोटारीत बसून आल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावून नियमांचे पालन केले आहे.________________________________
वाहन चालवताना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करत राहिलो आणि अपघात होणार नाही याची काळजी घेतली तर एक दिवस रस्ते सुरक्षेचे हे स्वप्न नक्कीच साकार होईल. हीच यंदाचा देखावा साकरण्यामागाची संकल्पना आहे._
*अनुजा देशमुख*यशवंतनगर, अकलूज






