*वेळापूर येथे गौरी समोर आधुनिक युगात महिला ही सजावट केली आहे.*
संग्रामनगर दि.४ (केदार लोहकरे याजकडून)सोन्याच्या पावलांनी आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीचे ठिकठिकाणी आगमन झाले.गौरीच्या स्वागतासाठी गृहिणींची लगबग सुरू होती.गौरीसाठी स्वच्छता व सजावट करण्यात गृहिणी त्या गुंतल्या होत्या. गौराई माझी लाडाची लाडाची गं म्हणत गौरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.दर्जेदार स्वागतानंतर वेगवेगळ्या कल्पनानी गौरी समोर आकर्षक सजावट केल्याचे दिसुन येत आहे. आधुनिक युगातील स्री ही आपला संसार संभाळून नोकरी करत आपल्या घराच्या प्रगतीत हातभार लावत आहे.माळशिरस तालुक्यातील वेळापूर (शेरी) येथील सौ.मोहिनी शरद मिसाळ यांच्या निवासस्थानी असलेल्या गौरीसमोर एका ऑफिसमध्ये दोन महिला काम करत असलेला देखावा केलेला आहे.यामध्ये एक महिला शासकीय कार्यालयात एका टेबल व खुर्चीवर बसून फाईली,पेन,टेलिफोन,कॅल्क्युलेटर बघत आहे तर दुसरी महिला लॅपटॉपवर ऑनलाइन कामकाज करीत असल्याचा देखावा केलेला आहे.आजच्या युगात स्री ही चुल आणी मुल यात न गुंतता पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहेत.त्यामुळे ही सजावट सर्व महिलांचे लक्षवेधुन घेत आहे. वेळापूर परिसरात सौ.मोहिनी मिसाळ यांनी केलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या सजावटीसाठी त्यांना प्राजक्ता मिसाळ व प्रणोती मिसाळ यांनी सहकार्य केले.






