अकलूज (प्रतिनिधी )2 सप्टेंबर रोजी छावा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व मोहीते पाटील गटाचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते किशोर नाना घोलप यांच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त गांधी चौक अकलूज येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन धैर्यशील मोहीते पाटील यांच्या हस्ते झाले.सदर शिबिरात 262 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या प्रसंगी भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिह माने पाटील व शिवतेजसिह मोहीते पाटील, व माळशिरस तालुका व इंदापूर तालुक्यातील युवकांनी किशोर नाना घोलप यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.








