• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

बी.ए.प्रथम वर्ष स्वागत समारंभ उत्साहात संपन्न*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 2, 2022
in शैक्षणिक
0
बी.ए.प्रथम वर्ष स्वागत समारंभ उत्साहात संपन्न*
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*बी.ए.प्रथम वर्ष स्वागत समारंभ उत्साहात संपन्न* संग्रामनगर दि.२ (केदार लोहकरे याजकडून) येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये बी.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे औचित्य असे होते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी वर्गामध्ये आलेले नैराश्य झटकण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन युवकांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याच्या भूमिकेतून आणि नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा नवीन परिसर,महाविद्यालयातील सोयी-सुविधा,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,महाविद्यालयातील योजना, महाविद्यालयातील उपक्रम विषयी सांगोपांग आढावा घेता यावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आली. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाळासाहेब मुळीक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये डॉ. मुळीक यांनी नव्याने प्रवेशित झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे की आपल्या महाविद्यालयास ज्ञानदानाच्या क्षेत्रात पंचावन्न वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. देश-विदेशामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे हे महाविद्यालयाच्या प्रगतीवरून लक्षात येते.सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटलांनी गोर-गरिबांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी याच हेतूने या शिक्षण संस्थेची उभारणी केलेली आहे. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर प्रवेशित विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय मगर यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.त्या नंतर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा महर्षी अकॅडमीचे मार्गदर्शक अजित चंदनकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाची ओळख करून दिली ही ओळख आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सांगत असताना आपल्या आयुष्यातील वेळ अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे आणि तिचा सदुपयोग करा असे आवाहन केले. राष्ट्रीय छात्र सेनेचा सीनियर अंडर ऑफिसर सत्यजित चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेने विषयी आपली भूमिका मांडत असताना आज तागायत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे तब्बल 28 विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक एकचे एनसीसीचे युनिट म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालयाकडे पाहिले जाते.पुढे त्याने सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या एकता,अनुशासन आणि राष्ट्रप्रेम विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. या स्वागत समारंभामध्ये महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर ग्रंथालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय पाटील यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने ग्रंथालयातील सोयी-सुविधा,योजना, उपक्रमांविषयी माहिती दिली.पुढे महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे संचालक प्रा.अरविंद वाघमोडे यांनी महाविद्यालयाच्या खेळातील कामगिरीबद्दल अकलूज ते प्यारा ओलंपिकचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडला.आज तागायत महाविद्यालयातील शेकडो खेळाडू राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आहेत 35 पेक्षा जास्त खेळाडू यांनी या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे.पुढे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या सदस्या प्रो. डॉ. अपर्णा कुचेकर यांनी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला. सलग दोन वेळा गोल्डन बॉय पुरस्कार, विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशिप, शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अश्वमेध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे नैपुण्य तसेच आजवर या विभागाने मनोरंजन क्षेत्रामध्ये शेकडो विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. शेवटीच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.दत्तात्रय बागडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्रभर असलेल्या महाविद्यालयाच्या नावलौकिकाचा उल्लेख करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय आदर्शवत कार्य करीत आहे या कार्याला शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते-पाटील,कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सह-सचिव हर्षवर्धन खराडे-पाटील या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास केंद्रबिंदू मानून आपली शिक्षण संस्था आणि महाविद्यालय महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत कामगिरी बजावत आहे. या स्वागत समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.विनायक सूर्यवंशी,डॉ.हणमंत आवताडे, डॉ.आण्णासाहेब नलवडे,प्रा.दादासाहेब कोकाटे, प्रा.प्रसाद लोहार,प्रा.रविराज सोनवणे, डॉ.चंद्रशेखर ताटे,कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे,सलिम शेख,नागनाथ साळवे,सुरेश बनपट्टे,सुरेश पिसे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा.निवृत्ती लोखंडे केले व सर्व उपस्थितांचे आभार प्रा.स्मिता पाटील यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तातडीने बैठक लावण्या बाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांना निवेदन

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तातडीने बैठक लावण्या बाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In