अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड
अकलूज (प्रतिनिधी )अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अक्कलकोट तालुक्यात मोठा जल्लोष करण्यात आला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे ते समजले जातात.माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे महिलेच्या प्रकरणात अडकल्याने त्यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते.दरम्यान त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपा ला चांगले दिवस येतील. असे राजकीय वर्तुळातून बोलले जातं आहे.








