• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे 25ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत 50%च्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या योगेश केदार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 26, 2022
in राजकारण
0
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे 25ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत 50%च्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या योगेश केदार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे 25ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत 50%च्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या योगेश केदार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.

अकलूज (प्रतिनिधी )मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे 25ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खानिकर्म मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, योगेश केदार,मराठा क्रांती ठोक मोर्चा धनाजी साखळकर, महेश डोंगरे, अमीत घाडगे,पाटील हनुमंत फपाळ, रामभाऊ गायकवाड,शिवराज पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.यासंदर्भात बोलताना या बैठकी साठी उपस्थित असलेले योगेश केदार म्हणाले की, सदर बैठकच काही मराठा नेत्यांनी स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी बोलावली होती का? याचा दाट संशय येतोय. आरक्षण सोडून इतर चिल्लर गोष्टीवर चर्चा कोणत्या सरकारला आवडत नाही? अनेकांचा आवाज दाबला जात होता. अशी बैठक यापूर्वी कधीच बोलावली गेली नाही. त्यामुळे सरकारचे आभार माना हे संभाजीराजे वारंवार का बोलत होते? हेच कळले नाही. अरे सरकार चे परम कर्तव्य आहे, मराठा समाजाला बोलावून भूमिका ऐकण्याचे. सरकार ने बैठक बोलावली म्हणजे काही उपकार केले नाहीत मराठा समाजावर. आणि काही बिकाऊ अभ्यासक आणि याचीका कर्त्यांची नावं जाणीवपूर्वक पुढे करत होते. दुसरे अभ्यासक नाहीत का समाजात? या बाबी समाज म्हणून आम्हाला पटलेच नाही. महाराजांनी प्रामाणिक लोकांना महत्त्व द्यावे, चाटू कारांना नाही. समाजात खुप दिग्गज दिग्गज लोक आहेत पण ते समोर येऊ शकले नाहीत. या वेळी मराठ्यांना 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण! ही घोषणा सुरुवातीलाच योगेश केदार यांनी दिली. एकनाथजी शिंदे यांनी चीढून, हे बरोबर नाही असे बोलायला सुरुवात केली. त्यावेळी केदार त्यांना म्हणाले की, साहेब तुम्ही जेंव्हा गुवाहाटी ला गेला होता ना त्यावेळी तुमचे समर्थन करणारा पहिला असेन. भरपूर लेख लिहिले. मग आत्ता तुम्ही आमचा आवाज का दाबत आहात? त्यावर एकनाथ संभाजी शिंदे जी लगेच नॉर्मल होऊन, हसून बोलायला लागले. आम्ही गेले अडीच वर्ष आम्ही आमचे आयुष्य धोक्यात घालून आघाडी सरकार विरोधात आंदोलन करणारे लोक आहोत. शांत बसणार नाही. बोलणारच. यानंतर पोलिसांनी योगेश केदार यांना काही काळ उचलून नेतो बाहेर नेतो अशा वल्गना करत घेरून ठेवले. नेहमीप्रमाणे बैठक केवळ सारथी, आणि इतर फुटकळ गोष्टींवर उरकून घेण्याचा नाद काही समन्वयक आणि नेत्यांनी ठेवला होता. सरकार ला तेच पाहिजे असते. बैठक संपत आली तरी आत्ता आरक्षण वर येतील मग येतील. असे वाटत असताना कोणीही यावर बोलत नव्हते.पोलिसांचे दुर्लक्ष बघून केदार यांनी पुढे उभारून 23 मार्च 1994 च्या जी आर चा आधार घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून बोलायला सुरुवात केली. लगेच शंभुराजे देसाई आणि दादा भुसे नावाचे मंत्री आरक्षणाचा विषय आत्ता नको, आत्ता नको नंतर बोलू म्हणून विरोध करू लागले. काही समन्व्यक यांनी देखील यात गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. केदार यांनी आवाज वाढविल्यावर . पुन्हा हे चतुर बोलू लागले की केदार उंच आवाजात बोलतोय. अरे असा आवाज दाबल्यावर माणूस जोरात बोलणारच ना! एकदा सगळे पुन्हा शांत झाल्यावर पुन्हा त्यांनी मराठ्यांनी सगळ्यात जास्त बलिदान कशासाठी दिले?असा प्रश्न केल्यावर सर्वांनी आरक्षण साठी असे उत्तर दिले.. मग त्यावर चर्चा करा ना. असे निक्षुन सांगितल्यावर तरी पुन्हा गोंधळ घालण्यात आला.हे सर्व घडत असताना प्रवीण दरेकर उठून बोलू लागले. मी समाजासाठी समाजाच्या समन्वयक कार्यकर्त्यांसाठी सढळ हाताने मदत केली. आजही करतोय. पण मी कधीही दाखवत नाही. आम्ही पण मराठा आहोत. असे बोलून केदार यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावर ते त्यांना म्हणाले दरेकर साहेब तुम्ही लय हुशार आहात आम्ही अडाणी आहोत, पण आमचं म्हणणं तरी ऐकुन घ्या. यावर मलिद्याची अपेक्षा करणारे दरेकर ला काहीच बोलत नव्हते. का? तर आता निष्ठा या नवीन सरकार वर दाखवायच्या होत्या. समाजाशी यांना काहीच घेणे देणे नाही. योगेश केदार शांत होत नाही हे बघून दादा भुसे यांनी हाताला धरून ओढून घेतले व स्वतःच्या खुर्चीवर बसवले.पुन्हा मुख्यमंत्री बोलू लागले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना किती चांगल्या आहेत हे बोलून दाखवले. त्यांचे भाषण झाल्यावर संभाजीराजेंनी आभार मानले. त्याही वेळी केदार यांनी 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मराठ्यांना द्या असे सरकार ला निक्षून सांगितलं. आणि बैठकीचा शेवट केला.एकूणच काय तर या बैठकीत 50%च्या आत ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी करणाऱ्या योगेश केदार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला.

चौकट :-

*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर ‘मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे’ हा आवाज पुन्हा बुलंद केला. ही गरीब विस्थापित मराठ्यांची खरी भूमिका आहे ती घेत राहणार. मला कोणी काहीही म्हणा, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी ही मागणी सोडणार नाही. माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलतोय…. माझे आयुष्यात काहीही होवो…माझ्या माघारी माझ्या येणाऱ्या पिढ्यांना समाज नक्कीच भरभरून आशीर्वाद देईल.

*योगेश केदार

बैठकीत आक्रमक होत 50%च्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करताना योगेश केदार
🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
मॉडेल विविधांगी प्रशालेतील बाल गणेशांनी लुटला शाडूमाती पासून गणपती बनविण्याचा आनंद – रोटरी क्लब अकलूजचा उपक्रम

मॉडेल विविधांगी प्रशालेतील बाल गणेशांनी लुटला शाडूमाती पासून गणपती बनविण्याचा आनंद - रोटरी क्लब अकलूजचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In