भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉटर मॉम फाउंडेशन तर्फे मुलींना 75 सायकलीचे वाटप करण्यात आले .
मुलींनी शिक्षण घ्यावे त्यांनी शैक्षणिक प्रगती करावी म्हणून डॉटर्स मॉम फाउंडेशन कडून मुलींना सायकली भेट देण्यात येत आहेत यातूनच सायकल बँक ही संकल्पना उदयास येत आहे या सायकल बँक मुळे मुलींची शाळेत जा करण्याची सोय झाली .15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील मुलींना 75 सायकलीचे वाटप करण्यात आले यामुळे डॉटर्स मॉम फाउंडेशनची सायकल बँक संकल्पना आदर्शवत ठरत आहे फाउंडेशन अध्यक्ष सौ शितल देवी मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात एक सायकल चळवळ उभी केली आहे ज्या गावातून वाड्यावर त्यातून मुलींना शाळेत जाण्यासाठी बस सेवेची सुविधा नाही अशा मुलींना डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे सायकल वाटपाचा निर्णय घेतला आहे .इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या व तीन किलोमीटर पेक्षा लांबून शाळेसाठी प्रवास करणाऱ्या एकूण 3650 मुली असून या सर्व मुलींना येत्या पाच वर्षात सायकल बँकेतून सायकल वाटप करण्यात येणार असल्याचे शितलदेवी मोहिते पाटील यांनी सांगितले .सदरच्या सायकलीसाठी सुमारे एक कोटी 45 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून गरजू मुलींना शिक्षणासाठी या सायकली दिल्यानंतर त्यांनी परत शाळा सोडून जाताना सदरच्या सायकली पुन्हा शाळेत जमा करायच्या आहेत सदरच्या सायकली गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्याकडे डॉटर्स मॉम फाउंडेशन अध्यक्ष संशितल देवी मोहिते पाटील व डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या महिला सदस्य यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आल्या .









