माळशिरस तालुका भाजपा च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त खुडूस येथे वृक्षारोपण.
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील,सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे. खुडूस येथे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर,सुरज म्हस्के धनाजी ठवरे,रामचंद्र ठवरे,बाळासाहेब वावरे,पीनू माने,पंजाबराव घाडगे,सुरज ठवरे,अंकुश ठवरे,सदाशिव ठवरे,बाजीराव सरगर,सुरज मुख्तर कोरबू ,अमित पुंज,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.









