श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड पुणे येथे 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न….
आज 15 ऑगस्ट रोजी पुणे कोथरूड येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार मेजर संजयजी सरगर यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार मेजर संजयजी सरगर यांनी ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम हे महत्त्वाचे असून 150 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाचे बलिदान देत देश गुलामगिरीतून मुक्त केला आणि आता या देशाला पुढे नेण्यासाठी चांगल्या पिढीची गरज असून ही पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांवर आहे असे सांगत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्काऊट गाईड संचलन, विद्यार्थीनी देशभक्तीपर केलेली भाषणे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे केलेले उत्तम सुत्रसंचालन,ढोल ताशे पथक इ.कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयाने केलेल्या कामाची प्रशंसा केली.पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाल्यांना शिकवण्याकडे असलेला ओढा हा चुकीचा असून सध्या शाळेमध्ये अमेरिकेतून आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांचे कौतुक केले.तसेच देशाला महासत्ता करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी ध्येय निश्चित करून आतापासूनच तयारी केली तर काही अशक्य नसल्याचे सांगितले..प्रारंभी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुमारी एल.व्ही.जाधव यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत विद्यालयाचा प्रगतीचा आढावा सांगितला. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बी.ए.पवार,काळे सर,जावळे मॅडम, क्षिरसागर मॅडम,विद्यार्थी पालक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते…




















