*तिरंग्याच्या रंगाप्रमाणे आपल्या बालकांना पोषण आहार द्या-पर्यवेक्षिका वैशाली टेके.
**हर घर तिरंगा,हर घर पोषण, कार्यक्रमा अंतर्गत लवंगमध्ये महिला मेळावा.*
संग्रामनगर दि.१० (केदार लोहकरे याजकडून)लवंग तालुका माळशिरस येथे भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकलूज अंतर्गत प्रकल्प अधिकारी बालाजी अल्हडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लवंग येथील अंगणवाडीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यवेक्षिका वैशाली टेके यांनी हर घर तिरंगा,हर घर पोषण या अभियाना अंतर्गत,“सर्व महिलांनी आपल्या बालकांना आपला देशाचा अभिमान झेंडा (तिरंग्याच्या) रंगाप्रमाणे पोषण आहार दिला पाहिजे,केसरी रंगाची फळे पपई, संत्री.पांढरा रंग म्हणजे दूध, दही, अंडी आणि हिरवा रंग म्हणजे हिरव्या पालेभाज्या.हा आहार सातत्याने दिला तर बालके व तुम्ही स्वतः महिला सुदृढ होणार आहात.”असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी केंद्र प्रमुख नितीन साने यांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान झेंडा आपल्या घरावरती लावण्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रमोद टोणपे मुख्याध्यापक, दिगंबर सरवदे,पांडुरंग वाघ,विक्रम भोसले पोलीस पाटील,दिपाली वाघ माता पालक समिती सदस्या कविता बरडे तलाठी लवंग,धनाजी चव्हाण ग्रा.पं. सदस्य नितीन वाघ,लालासो गायकवाड,दिलीप मुळे,प्रीतम खाडे,पोपट गायकवाड, अंगणवाडी सेविका उषा वाघ,सविता पवळ, लक्ष्मी शिंदे,अश्विनी पाटील,सारिका कांबळे,वनिता भोईटे,मदतनीस शकुंतला पवळ व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








