स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त अकलूज मुली नं.१ शाळेत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन.
अकलूज : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जि. प. प्रा. शाळा, मुली नं.१ अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर या शाळेत समूह साधन केंद्र अकलूजचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. .यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती फेरी,इत्यादी बाबींचा समावेश आहे.गुरुवार दि.०४/०८/२०२२ रोजी नगरपरिषद अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जि प. प्रा. मुलींची आदर्श शाळा नं.१अकलूज या शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे उद्घाटन नगरपरिषद अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालयीन अधीक्षक सुनील काशीद उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना नगरपरिषदेमार्फत शैक्षणिक वस्तू रूपाने पारितोषिके देण्यात येणार आहेत.शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. सर्व विद्यार्थिनींच्या मनात देश प्रेम जागृत होत असून सर्व विद्यार्थिनी व शिक्षक यांनी १००% घरांवर तिरंगा फडकविण्याचे ठरविले आहे. सर्वांना ध्वज संहिता समजावून सांगण्यात आली आहे.उपक्रम व स्पर्धा राबवीत असताना मुख्याध्यापक मोहन इंगोले व शाळेतील शिक्षक दत्तात्रय धाइंजे, कैलास गायकवाड, सीमा सुरवसे, उज्वला भोसले, उमेश फलटणकर व संतोष यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.













