*राज्यपालांनी अखेर माफी मागितली*
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर राज्यभरात राज्यपालांविरुध्द रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. सोमवारी माफीचे एक निवेदन राज्यपाल भवनातून जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका भाषणात मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी समाज निघून, तर येथे पैशाच राहणार नाही. मग मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असे विधान राज्यपालांनी केले. त्यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्यावर टीका केली. तर काही ठिकाणी राज्यपालांच्या विरोधात आंदोलन झाली. राज्यपालांच्या विधानवरून भाजपवर थेट आरोपही होऊ लागले होते. त्यानंतर आता राज्यपाल यांनी याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. त्यात थेट महाराष्ट्राची माफी मागण्यात आली. ‘काही समाजबांधवांच्या योगदानाचा कौतुक करताना माझ्याकडून कदाचीत काही चूक झाली आहे. परंतु गेल्या तीन वर्षांत राज्यातील जनतेचा मला अपार प्रेम मिळालं आहे.मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु भाषणामधून माझ्याकडून चूक झाली असेल, या चुकीला या थोर महाराष्ट्राने अवमान समजला जाईल ही कल्पना मला करवत नाही. महाराष्ट्रातील महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या अंतःकरणात पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असे निवेदनात राज्यपालांनी म्हटलं आहे







