*शंकरराव मोहिते महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.*
संग्रामनगर दि.१ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दलित,उपेक्षित,शोषित,वंचित,कामगार घटकांतील समाजाला नायकत्व बनवून साहित्यामध्ये त्यांचा प्राधान्याने विचार करून,अन्यायच्या विरुद्ध बंड करण्याची भाषा केली असे मत कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.दत्तात्रय बागडे यांनी अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी समारंभ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा १८ वा वर्धापन दिनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. डाॅ.दत्तात्रय बागडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला.त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे स्मरण केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील जुनिअर विभागाचे प्राध्यापक आर.के.इंगोले,डॉ.हनुमंत अवताडे,डॉ.अपर्णा कुचेकर,डॉ. विश्वनाथ आवड,कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जनार्दन परकाळे यांनी केले.







