*सर्व सामान्य जनता,पक्षकार करीता कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणेकरिता माननीय मुख्यमंत्री यांना लवकरच भेटणार.माजी खासदार राजू शेट्टी*
कोल्हापूर दि.28 (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर येथे सहा जिल्हयासाठी सर्किट बेंच स्थापन करणेसाठी सहा जिल्ह्यातील लोकांचा गेली 35 वर्षे लढा चालू आहे.कोल्हापूर येथे सर्किट बेंच सर्व सामान्य जनता,पक्षकार करीता स्थापन होणे आवश्यक आहे याकरिता लवकर मुख्यमंत्री यांना भेटणार आहे असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोला सदिच्छा भेट दिले त्यावेळी केले. माजी खासदार यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला आज सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचा शाल,श्रीफळ देऊन अध्यक्ष अॅड.गिरीश खडके यांनी सत्कार केला.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांना खंडपीठ कृती समिती वतीने सर्किट बेंच स्थापने बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत केले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की.गोर गरीब,वंचिताकरीता जलद, व कमी खर्चात न्याय द्यायचा असेल तर कोल्हापुरात सहा जिह्ल्याकरीता सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक आहे.महाराष्ट्रातील जवळचा राज्यात सर्किट बेंचची स्थापना लवकर होत असेल तर कोल्हापूर सर्किट बेंच मागणी सहा जिल्ह्याची असून देखील 35 वर्षे विलंब का ? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्किट बेंच प्रश्नी मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन देणार आहे असे प्रतिपादन माजी खासदार यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असो अध्यक्ष अॅड.गिरीश खडके व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य अॅड.विवेक घाटगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्किट बेंच स्थापनेचा प्रश्न अंतिम टप्यात आहे तरी आपण मुख्यमंत्री यांचे कडे पाठपुरावा करावा असे आवाहन करणेत आले. यावेळी कोल्हापूर सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष अॅड.चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष अॅड.प्रमोद कदम,सचिव अॅड.पांडूरंग कावणेकर यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांचे हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.संकेत सावर्डेकर,माजी अध्यक्ष अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.संपतराव पवार,अॅड.प्रकाश मोरे,अॅड.राजेंद्र किंकर,अॅड.दिपक पाटील तसेच सर्व सभासद वकील मोठ्या संख्येनें उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड.संदीप चौगुले यांनी केले. त्यानुसार महाराष्ट्र शासनातर्फे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करावे यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी महाराष्ट्र शासन करणेस तयार आहे असे पत्र माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई उच्चन्यायालयाचे मुख्यन्यायमूर्ती यांना त्यांचे कारकिर्दीत दिलेले आहे. सदर सर्किट बेंच निर्णयाची बाब माननीय मुख्यन्याय मूर्ती यांचे अंतिम निर्णयावर प्रलंबित आहे. सध्याचे मुख्यन्यायमूर्ती माननीय श्री दीपांकर दत्ता यांची व खंडपीठ कृती समिती मिटिंग 10 मार्च 2022 रोजी झाली. त्यांनतर मा.मुख्यन्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्यमंत्री यांची भेट होऊन चर्चा झालेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे पत्राने दिनांक 21/6/2022 रोजी खंडपीठ कृती समितीस कळविले होते.परंतु मागील तिन्ही माजी मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन सहा जिल्हाकरिता कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे असे निसंधिग्ध पणे कळविले असल्याने त्यावर निर्णय घ्यावा अशी विनंती खंडपीठ कृती समिती अध्यक्ष अॅड.गिरीश खडके व सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांचे वतीने करण्यात आली होती.त्यांनतर पुन्हा माननीय मुख्यन्याय मूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची मिटिंग झाले नंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे दिनांक 19/7/2022 रोजीचा पत्राने खंडपीठ कृती समितीस कळविले असल्याने सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तातडीने पाठपुरावा करून त्यांनी याकामी माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई व माननीय मुख्यमंत्री यांची एकत्र मिटिंग घेणे करीता प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सहा जिल्ह्यातील वकील,पक्षकार यांचे वतीने करण्यात येत आहे.असे निवेदन मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती कृतीसमिती चे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके व सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी प्रसिद्धीस दिले आहे.










