अकलूज फार्मसी काॅलेजमध्ये प्राध्यापक-पालक सहविचार सभा संपन्न.
संग्रामनगर दि.२७ (केदार लोहकरे याजकडून)
महाविद्यालयीन शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक,विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्यानचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी मत व्यक्त केले
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.अनिल भानवसे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
श्रीमती रत्नप्रभादेवी शंकराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून सहविचार सभेस सुरुवात करण्यात आली.
ते पुढे म्हणाले विद्यार्थी,पालक व प्राध्यापक यांच्यामधील संभाषणाची दरी कमी होऊन स्पर्धेच्या युगात त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालयात राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनिल भानवसे यांनी यावेळी दिली.
सदर सभेमध्ये महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पालकांच्या सूचनांचे स्वागत करण्यात आले तसेच याप्रसंगी काही उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.मुकुंद गाडे व सूत्रसंचालन प्रा.स्वप्निल राजे घाडगे यांनी केले तर सभेच्या शेवटी प्रा.रविराज जळकोटे यांनी आभार मानले.









