विजय ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी संतोष ऐवळे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना अटक करावी -संजय गोरवे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील विजय ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी संतोष बापू ऐवळे हे पतसंस्थेच्या वसुली कामासाठी गेले असता,कर्जदार आरोपी ने संतोष ऐवळे याला जातीवाचक शिवीगाळ करून लाथा -बुक्यानी मारहाण केली.मारहाण करणाऱ्या आरोपीना लवकरात लवकर अटक करणेबाबत स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे पश्चिम महाराष्ट अध्यक्ष संजय गोरवे यांनी अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना निवेदन दिले आहे.निवेदनात पुढे असे सांगितले आहे की,कर्जदार व्यक्ती बरोबर असलेल्या इसमांनी देखील शिवीगाळ व मारहाण केली.याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतसंस्थेचा कामगार हा मागासवर्गीय असल्यामुळे त्याला दमदाटी करण्यात आली.संबंधित आरोपी वरती मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून,त्यांनी पतसंस्थेच्या विरोधात केलेली तक्रार चुकीची आहे.तरी संबंधित आरोपी वर गुन्हा दाखल केलेला असून, त्या आरोपीना लवकरात लवकर अटक करण्यात यावी.अन्यथा स्वाभिमानी होलार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.







