• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

सोमनाथ हुलगे यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीवरून सुरू केलेली मोहिते पाटलांची बदनामी थांबवावी – उल्हास वाघमोडे*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 25, 2022
in राजकारण
0
सोमनाथ हुलगे यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीवरून सुरू केलेली मोहिते पाटलांची बदनामी थांबवावी – उल्हास वाघमोडे*
0
SHARES
300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सोमनाथ हुलगे यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीवरून सुरू केलेली मोहिते पाटलांची बदनामी थांबवावी – उल्हास वाघमोडे*

अकलूज (प्रतिनिधी ): विजय मल्टीस्टेटचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना उद्योगधंद्यासाठी कर्ज देताना कधीही जात-पात पाहिली नाही. सोमनाथ हुलगे यास कर्ज देताना कधी त्याची जात पाहिली नाही. २००३ साली एक लाख रूपयांचे दिलेले कर्ज १९ वर्षानंतर वसूल करण्यासाठी बोलविले हा त्यांचा गुन्हा आहे का? त्यांच्या डोक्यात जातीयवाद असता तर त्यांनी सोमनाथ हुलगे यास कर्जच दिले नसते. कर्ज देणे, घेणे हा त्यांचा वैयक्तिक विषय असताना सोमनाथ हुलगे याने कुणाच्या तरी सांगण्यावरून मी अहिल्यादेवी होळकरांची जयंती केल्यामुळेच मला धैर्यशील मोहिते पाटील यांनी मारहाण केली असा कांगावा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र तसा प्रकार घडला असता तर त्याने फिर्यादीतच तसे नमूद करायला पाहिजे होते. पण धैर्यशील मोहिते पाटील यांची बदनामी करण्यासाठी हा सारा बनाव आहे असे म्हणून वैयक्तिक स्वार्थासाठी अहिल्यादेवींच्या जयंतीवरून समाजाची दिशाभूल करून सोमनाथ हुलगे याने समाजाला वेठीस धरणे थांबवावे व अहिल्यादेवी जयंतीवरून सुरू केलेली मोहिते पाटलांची बदनामी थांबवावी असे प्रतिपादन धनगर समाजाचे अकलूज उपाध्यक्ष उल्हास वाघमोडे यांनी केले आहे. यावेळी पुढे बोलताना उल्हास वाघमोडे म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी सोमनाथ हुलगे याचा कळसूत्री बाहुलीप्रमाणे वापर करून धैर्यशील मोहिते पाटलांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमनाथ हुलगे याने एकट्याचा व्हिडीओ बनवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सदरचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांना समाजाचे दुश्मन संबोधून त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. अकलूजसह दहा गावांनी मिळून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अकलूजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली. तेव्हा धैर्यशील भैय्यासाहेब व मोहिते पाटील कुटुंबातील सर्व व्यक्तींनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे. धैर्यशील मोहिते पाटील तर दिवसभर आमच्यासोबत राहून आमच्या मर्दानी खेळासह इतर विविध कार्यक्रमातील कलावंतांना योग्य बक्षीस देऊन व मानसन्मान करून जयंतीच्या मिरवणुकीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. त्यावेळी आमच्या समाजातील जनभावना ओळखून त्यांनी आम्हाला आपल्या अकलूज परिसरामध्ये अहिल्यादेवींचा भव्यदिव्य पुतळा बसविण्यासाठी एखादी जागा निश्चित करा, त्यावर साधक बाधक चर्चा करून दोन महिन्यात पुतळा बसवू असे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये विद्यापीठाचा लढा सुरू असताना प्रत्येक पंचायत समितीला भेटून आल्यावर कुणीही नामांतरासाठी ठराव दिलेला नव्हता, पण महाराष्ट्रातला पहिला ठराव व सोलापूर जिल्ह्यातला पहिला ठराव धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीने विशेष मिटींग घेऊन एकमताने तो ठराव मंजूर केला ही बाब प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सरांना विचारा. माजी उपमुख्यमंत्री यांच्याकडे पर्यटन खाते असताना अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी अहिल्यासृष्टी निर्माण करण्यासाठी दोन ते अडीच कोटी निधी आण्णासाहेब डांगे यांना दिलेला आहे. आम्ही चौंडीला गेल्यावर त्यांनी मोहिते पाटलांचे आभार मानले. अशाप्रकारे मोहिते पाटील कुटुंब कायम धनगर समाजाच्या पाठीशी असताना आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सोमनाथ हुलगे हे जाणीवपूर्वक समाजाला वेठीस धरून विनाकारण मोहिते पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे धनगर समाजाने त्याच्या या कुटील डावाला अजिबात बळी न पडता सत्य वस्तुस्थिती जाणून घ्यावी असे आवाहन उल्हास वाघमोडे यांनी केले आहे. संजय पाडूळे, रणजित सुसलादे, सुधाकर पोटे, शिवाजी घोडके, संजय पिसे, अभिषेक घुले, रूपेश पोटे, अरूण नरुटे, राहुल माने, निलेश ठोंबरे, नागेश शिंदे, तात्या पोटे, सोमा सरगर, राजू नरुटे, अमोल राजगे, विशाल लाळगे, अनिल इरकर यांच्यासह धनगर समाज उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. *चौकट*धैर्यशील मोहिते पाटील यांना बदनाम करण्यासाठी सोमनाथ हुलगे यांचेडून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे भांडवल केले जात आहे. तसेच प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी धनगर समाजाचा मोर्चा काढण्याची धमकी दिली जात आहे. मात्र सोमनाथ हुलगे व विरोधकांनी मोहिते पाटलांच्या विरोधात समाजाला घेऊन मोर्चा काढलाच तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यासाठी मोर्चा काढू.*- अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे, धनगर समाज उन्नती मंडळ, अकलूज*

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
‘हा माझा वैयक्तिक नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान’*नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

'हा माझा वैयक्तिक नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान'*नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In