राजकारणाला समाजकार्यांची जोड देणाऱ्या जि. प. सदस्या स्वरूपाराणी (राणूदीदी )मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अकलूज (प्रतिनिधी ) काही माणसं राजघराण्यात जन्माला येऊन सुध्दा अतिशय साधी असतात. पण त्यांची विचारसरणी मात्र खूप मोठी असते. बोलण्यात नम्र, इतरांविषयी प्रेम, आपुलकी, आणि गोरगरीब लोकांविषयी असलेला कळवळा, तसेच समाज कार्याचा ध्यास घेतलेल्या बोरगाव जि. प. गटाच्या सदस्या कु. स्वरूपाराणी (राणूदीदी )यांचा आज 25जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना पुढील उज्वल कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.स्वरूपाराणी या माळशिरस तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे केली आहेत.वेगवेगळ्या बंधाऱ्या च्या निर्मिती बरोबरच वीज, रस्ते, शेतकऱ्यांच्या समस्या,सर्व सामान्य नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर राहिला आहे.एव्हढेच नव्हे तर, ज्या भागातील समस्या असतील तेथे संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करून ताबडतोब तो प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांचे कसब वाखानन्यासारखे आहे.त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजना,तसेच इतर प्रकारची विविध विकासकामे,व शासनाच्या अनेक योजना प्रभाविपणे त्यांनी राबविल्या आहेत.शिक्षण प्रसारक मंडळ च्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत.ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या त्यांनी अनेक समस्या सोडविल्या आहेत.महाराष्ट राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.सदर उपक्रम राबवित असताना त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, डॉटर मॉम च्या अध्यक्षा व जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, पंचायत समिती च्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती चे माजी उप सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची देखील मोलाची साथ लाभली आहे.लोकसंपर्क, प्रभावी वक्तृत्व, संयमी स्वभाव, आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. तसेच विविध प्रकारची आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, महिलांसाठी अनेक शिबीर आदी उपक्रम त्यांनी राबविले आहेत.प्रताप क्रीडा मंडळ च्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत. या मंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला -गुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा चे आयोजन केले आहे.गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी अनेक गोरगरीब नागरिकांना शिधा वाटप केले. एव्हढेच नव्हे तर अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.परिसरातील नागरिकांच्या सुख -दुःखात देखील त्या हिरीरीने सहभाग घेतात.आपल्या समाज उपयोगी कामांमुळे त्यांनी नागरिकांचे मने जिंकून आपला स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.आज 25जुलै त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना पुढील कार्यासाठी हृदया पासुन हृदया पर्यंत खूप खूप शुभेच्छा.

गणेश जाधव. पत्रकार. अकलूज.


























