अकलूज येथे ‘रत्नाई चषक’ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
अकलूज ता.23: प्रताप क्रीडा मंडळाच्यावतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त ‘रत्नाई चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा – 2022’ सोमवार (ता.25) रोजी होणाऱ असल्याची माहितीअध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली. शंकरनगर-अकलूज येथील सहकारमहर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.मोहिते-पाटील पुढे म्हणाल्या, या स्पर्धेसाठी वयोगट – 7 वर्षे, 11 वर्षे, 17 वर्षे आणि खुला असे गट असणार आहेत. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षीस व चषक आहे. प्रथम क्रमांकासाठी रु.1001 व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रु 701 व चषक, तृतीय क्रमांकासाठी रु.501 व चषक, चतुर्थ क्रमांकासाठी चषक व पाच ते दहा क्रमांकासाठी मेडल अशी बक्षिसे ठेवली असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूस रु.100 प्रवेश फी असून स्पर्धा रॅपीड पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी बुध्दीबळ सेट व घड्याळे स्वतः आणावयाची असून स्पर्धकांच्या संख्येवर राउंडची संख्या निश्चित केली जाणार आहे. प्रवेश नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी, स्पर्धेच्या दिवशी सकाळी 08 ते 09.30 वा. या वेळेतेच होणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ सकाळी 10.00 वाजता सहकार महर्षिचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार आहे. स्परधेषाषत अधिक माहितीसाठी व नावनोंदणी करण्यासाठी मो. 9422027928 / 9970103439 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, खजिनदार वसंत जाधव, सचिव पोपटराव भोसले पाटील, अभिजित बावळे, एस.टी. राऊत, यांचेसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते







