स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पनवेल (प्रतिनिधी )उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले. मा. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधीनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्धाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी , राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि आ. आशिष शेलार व्यासपौठावर उपस्थित होते.मा . चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाचे राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नावर संघर्ष केला. आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते अशा स्थितीत ना एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला.सी. टी. रवी यांनी सांगितले की,राज्यातील राजकीय परिवर्तना मुळे केंद्र सरकारच्याच विचाराचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परिश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था , लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. मा . शिवप्रकाशजी म्हणाले की, जनादेशचा सन्मान , भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, सामान्यांची सुरक्षितता आणि हिदुत्व यासाठी भाजपा शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाला जनमत अनुकूल आहे संघटनात्मक बांधणीत आता मोठी झेप घ्यायची आहे. प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले.







