अकलूज
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांचे विचार आणि पक्षाची धोरणे बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा निरीक्षक यांची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव मोहित गायकवाड यांची पुण्यातील कोथरूड आणि शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून निवड केली असून राष्ट्रवादी काँग्रेस ने महाराष्ट्रातील शंभर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलेअसून पुणे येथील कोथरूड आणि शिवाजी नगर अशा दोन विधानसभा मतदारसंघाची ची जबाबदारी मोहित गायकवाड यांच्या कडे दिली आहे सुपर हंड्रेड ही संकल्पना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवक कार्यकर्त्यांकडे निवडलेल्या मतदारसंघात पक्ष बांधणी ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यामुळे मोहित गायकवाड यांना दोन विधानसभा मतदारसंघा ची पक्ष बांधणी करावी लागणार आहे मोहित गायकवाड यांनी या आगोदर महाराष्ट् प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे संघटक सचिव म्हणून तीन वर्षे पक्षाचे काम केले होते म्हणून यांचे वर कोथरूड आणि शिवाजी नगर या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली या मुळे मोहित गायकवाड यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







