अकलूज रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ॲड.दिपक फडे, सचिवपदी केतन बोरावके तर खजिनदारपदी सीए शशील गांधी
अकलूज ता.11 : रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षपदी रो.ॲड.दिपक फडे, सचिवपदी केतन बोरावके तर खजिनदारपदी रो.सीए. शशील गांधी यांची निवड झाली असून त्यांचा व नूतन संचालक मंडळ यांचा पदग्रहण सोहळा 2024- 25 चे नियोजित प्रांतपाल रो.डॉ.सुरेश साबु (जालना) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .कृष्णप्रिया हाॅलमध्ये झालेल्या या पदग्रहण समारंभाचा शुभारंभ तुळशीला पाणी घालून करण्यात आला.मावळते सचिव गजानन जवंजाळ यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करुन पदग्रहण समारंभाचे स्वरूप व उद्दिष्ट सांगितले.तर मावळते अध्यक्ष सीए नितीन कुदळे यांनी वर्षभरात राबवलेल्या विक्रमी सामाजिक उपक्रमांची माहिती देवुन क्लब मधील सर्व सदस्यांनी, विविध संस्था तसेच देणगीदार यांनी केलेल्या मोलाचे सहकार्य यामुळेच यशस्वीपणे संकल्प पुर्ण केल्याचे सांगितले.याप्रसंगी नुतन अध्यक्ष रो.ॲड.दिपक फडे यांना मावळते अध्यक्ष नितीन कुदळे यांनी तर नुतन सचिव केतन बोरावके यांना मावळते सचिव गजानन जवंजाळ यांनी त्यांचेकडे सन्मानपुर्वक पदभार सोपविला. पदग्रहणानंतर नुतन अध्यक्ष दिपक फडे यांनी मागील सर्व अध्यक्षांचे तसेच सन्माननीय सल्लागार समितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही यशस्वीपणे वाटचाल करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी अकलूजचा पहिला पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या पारितोषिक सोहळ्यामध्ये रोटरी क्लब २०२१-२२ या वर्षातील विविध उपक्रमात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल इंजि.बबनराव शेंडगे, सुशील व्होरा, आशिष गांधी, सीए नितीन कुदळे, नवनाथ नागणे, केतन बोरावके, कमलेश शहा यांना फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर रोटरी क्लब मधील २५ वर्षातील सेवाभावी योगदानाबद्दल ज्येष्ठ रोटरी सदस्य संदीप देसाई आणि मकरंद जामदार यांना रोटरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.मान्यवरांच्या मनोगतात डॉ. सुरेश साबू यांनी मागील वर्षातील पर्यावरण, पाणी व्यवस्थापन, महिला व मुली सक्षमीकरण, आरोग्य, शांतता, शिक्षण, युथ सर्विस आदी क्षेत्रात विक्रमी प्रकल्प राबवल्याबद्दल अकलूज क्लब चे विशेष कौतुक करून, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत रोटरी क्लब ने विशेष पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.पदाधिकारी निवडीत नूतन खजिनदार सीए शशील गांधी, नुतन संचालक मंडळ :- क्लब ट्रेनर-गोमटेश दोशी, प्रेसिडेंट इलेक्ट ओजस दोभाडा, आयपीपी अँड ग्लोबल ग्रँड – सीए.नितीन कुदळे, वुमन एम्पॉवरमेंट – रो.प्रिया नागणे, क्लब एडमिन नवनाथ नागणे, मेंबरशिप डेव्हलपमेंट-योगेश व्होरा, टीआरएफ निलेश दोशी, पब्लिक इमेज गजानन जवंजाळ, विंन्स हनुमंत सुरवसे, कम्युनिटी सर्व्हिस बबनराव शेंडगे, सर्व्हिस मेडिकल -डॉ.बाहुबली दोशी, सर्व्हिस नॉन मेडिकल-रो.स्वप्निल शाह, व्होकेशनल सर्व्हिस-कल्पेश पांढरे, युथ सर्व्हिस प्रोजेक्ट इंटरॅक्ट -विक्रांत माने देशमुख, डीईआय कम्युनिटी-सकल दोशी, सार्जंट ॲट आर्मस-दत्तात्रय नलवडे, बुलेटिन एडिटर-अमित सोनाज व पृथ्वीराज भोंगळे, आरसीसी-पियुष व्होरा, व्हाइस प्रेसिडेंट-डॉ.अभिजीत गांधी, जॉईन्ट सेक्रेटरी-स्वराज फडे, सर्व्हिस प्रोजेक्ट ग्लोबल-अमेय व्होरा, सर्व्हिस प्रोजेक्ट लोकल-डॉ.अमोल फडे, ह्यूमन डेव्हलपमेंट आरआय एम्फासीस-गुरुदेव वैद्य, डिस्ट्रिक्ट एम्फासिस-अजिंक्य जाधव, रोटरी फॅमिली-धवल गांधी व गौतम गांधी, स्पोर्ट्स-अजिंक्य फडे व संदीप साळुंखे, कल्चरल ऍक्टिव्हिटीज- आशिष गांधी व कमलेश शहा यांच्या निवडी करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्र संचलन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार नुतन सचिव केतन बोरावके यांनी मानले.










