*शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्रा.सुधा बनसोडे यांचे न्यूयॉर्क अमेरिका येथे व्याख्यान.*
संग्रामनगर दि.८ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राणी शास्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रोफेसर डाॅ.सुधा बनसोडे (गायकवाड) यांचे न्यूयॉर्क अमेरिका येथे व्याख्याचे आयोजन केले आहे. WYN Confercnes Inc या जागतिक संस्थेचे आयोजित केलेल्या जागतिक चर्चा सत्रामध्ये काॅडिर्योलॅजी अॅड कार्डियो व्हस्क्यूलार मेडिसीन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रामध्ये “इफेक्ट आॅफ टेम्परेचर आॅन हार्ट” या विषयावर डाॅ.सुधा बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत.दिनांक १४ व १५ जुलै रोजी या व्याख्यनाचे आयोजन करण्यात आले आहे. डाॅ.सुधा बनसोडे यांनी यापूर्वी कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये पोस्ट डाॅक्टरेट डिग्री संपादन केलेली आहे.त्याच बरोबर अॅकॅडोमिक व्हिजीटर म्हणून त्यांनी अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, थायलंड,कॅनडा,नेदरलॅंड,स्पेन,जपान इत्यादी देशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे.त्याच बरोबर त्यांची आतापर्यंत स्वत:ची सात पुस्तके प्रकाशित झालेली असून दोन पुस्तकाचे काम चालू आहे.त्यांना आता पर्यंत उत्कृष्ट शैक्षणीक कार्याबद्दल व सामाजिक कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या डाॅ.सुधा बनसोडे जागतिक संशोधनावर जागतिक समीक्षक म्हणून कार्य करत असून विविध जागतिक जर्नल्सच्या विशेष संपादक सदस्य म्हणून काम पहात आहेत.







