*सभागृहात युतीच्या घोषणा, मी एकटा आलो नाही, तर सर्वांना घेऊन आलोः देवेंद फडणवीस
मुंबईः शिंदे गट व भाजपने विशेष अधिवेशनात विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर काही सदस्यांनी भाजप-युतीचा विजयी झाल्याच्या घोषणा दिल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे हे युतीचा मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे. तर मी एकटा आलो नाही, तर सर्वांना घेऊन आलो, असे फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. शिंदे व भाजपने १६४ मतांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात करताना एकनाथ शिंदे हे युतीचे मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे. शिंदे यांच्यामध्ये प्रचंड माणुसकी आहे. धर्मवारी आनंद दिघे यांचीही हीच शिकवण शिंदे यांनी घेतली आहे. ज्याला कोणी नाही, त्याला शिंदे आहेत. कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदतीला ते आले होते. ते कमी बोलतात. ताण आल्या की गावाकडे जावून शेती करतात. वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी येऊन ते खंबीर राहिले आहे. मी पुन्हा येईल, यावर टिंगलटवाळी झाली, पण मी आलो, मी बदला घेणार आहे. पण त्यांना मी माफ करणे हाच माझा बदला आहे. मी एकटा आलो नाही, सर्वांना घेऊन आलो, असे फडणवीस सभागृहात म्हटले. आमच्याकडे बहुमत असताना आम्हाला विरोधी पक्षात बसविले. पण विचलित झालो नाही. सातत्याने संघर्ष केला, जनतेचे कामे केली आहे. सत्ता हे आमचे साध्य नाही, सत्ता हे साधन आहे. जनतेने बहुमत देऊन ते हिरावलं हीच आमची खंत, शिंदेमध्ये आणि आम्हामध्ये असलेली मैत्री कायम आहे. शिंदेमध्ये आणि माझ्यामध्ये कधीही दुरावा दिसणार नाही. शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झालं आहे. हे सरकार सुडबुध्दीने काम करणार नाही. मुख्यमंत्री महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात उपलब्ध राहणार आहे. तर भाषणात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर ही टीका केली आहे.







