*ठरलं! अजित पवार विधानसभा विरोधी पक्षनेते…*
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान सर्व आमदारांनी अजित पवार यांना विरोधीक्षनेते पसंती दर्शवली. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी अजित पवारांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी आमदारांनी केली होती. गेले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस या पदावर होते. मात्र, आता सरकार बदलल्याने अजित पवार आणि फडणवीसांची जागा घेणार आहेत.







